शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
4
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
6
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
7
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
8
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
9
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
10
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
11
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
12
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
13
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
14
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
15
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
16
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
17
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
18
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
19
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
20
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण बेशुद्ध अन् कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 4:47 PM

रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

बीड : व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात राहिलेली ५० वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयात या रुग्णाला दाखल केल्यानंतर येथील तज्ज्ञांनी तपासले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बीडमधून औरंगाबादला रेफर करण्यात आले. हा सर्व प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता उघड झाला. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जामखेड येथील एक ५० वर्षीय इसम १८ ऑक्टोबर रोजी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. त्याच्यासोबत दाखल करताना एक नातेवाईकही होते. दारू, तंबाखू, गांजाचे व्यसन असल्याचे त्यांच्या प्रवेश पत्रावर लिहिलेले आहे. तसेच येरवडा येथे उपचार घेऊन आल्याचाही उल्लेख आहे; परंतु मंगळवारी सकाळी हा रुग्ण अचानक बेशुद्ध पडला. त्याला केंद्रातीलच दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल केले. फिजिशियनने तपासून मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले. डॉ. मोहंमद मुजाहेद यांनी तपासल्यानंतर रुग्ण गंभीर असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबादला रेफर केले. रेफर करेपर्यंतही हा रुग्ण शुद्धीवर आला नव्हता. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सोबत कोणी नसल्याने तो झाला नाही, तर केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बोलणे टाळले. रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञाची उपस्थिती बंधनकारकव्यसनमुक्ती केंद्राला आरोग्य संचालकांची परवानगी लागते. मेंटल हेल्थ ॲक्ट २०१७ नुसार शासन मान्यता आवश्यक असते. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ कायमस्वरूपी हजर असणे अवश्यक आहे. नार्को टेस्ट विभागाकडून याची तपासणी होणे अपेक्षित असते; परंतु बीडमध्ये असे काहीच नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच चक्कर येणे, बेशुद्ध पडण्यासारख्या घटना घडतात. याची तपासणी होणे आवश्यक आहे.

काय म्हणतात, व्यसनमुक्ती केंद्रचालकयाबाबत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. यावर एकाने मी काहीच बोलू शकत नाही, आपण डॉ. राजकुमार गवळे यांना बोला, असा सल्ला दिला. यावर डॉ. गवळे यांना बोलल्यानंतर त्यांनी शेरकर यांना बोला, असे सांगितले. त्यानंतर शेरकर यांना संपर्क केला. यावर ते म्हणाले, आठवड्यातून एक वेळा मानसोपचार तज्ज्ञ येतात. त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषधी दिली जातात. मीसुद्धा बाहेर आहे. काय घडले हे मला पहावे लागेल, असे सांगितले.

नेमका रूग्ण कोण? सर्व गोंधळचनवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात संबंधित रूग्ण दाखल झाला, तेव्हा त्याचे नाव वेगळेच आहे. त्याला औषधी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर आणि प्रवेशासह हमीपत्रावर वेगळेच नाव असल्याचे समोर आले आहे. नातेवाईक कोण आणि रूग्ण कोण? याचाच गोंधळ उडाल्याचे या कागदपत्रांवरून दिसले. यावरून येथील कारभार ढिसाळ आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.

अधिक उपचारासाठी औरंगाबादला पाठवले अपघात विभागातून कॉल येताच मी गेलाे. रूग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचार करणे आपल्याकडे शक्य नव्हते. प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला रेफर केले.- डॉ.मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, बीड

टॅग्स :Beedबीड