शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 12:04 AM

पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतकºयांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सात महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे

बीड : पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतक-यांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे. मागील सात महिन्यांपासून यावर कसलीच कारवाई झालेली नाही. यावरून अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.पाटोदा शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर मांजरसुंबा रस्त्यावर एमआयडीसी उभारण्यासंदर्भात बीडच्या कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जागेची पाहणी केल्यानंतर याला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत रस्ते व जलवाहिणीसाठी तब्बल १ कोटी ४० लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला. मात्र, एमआयडीसी कार्यालयाने येथील शेतक-यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शेतक-यांनी हे काम अडविल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, जुलै, मे महिन्यांपासून प्रश्न रखडलेला असतानाही कार्यालयाकडून शेतक-यांची भेट घेऊन अथवा पोलीस संरक्षण घेऊन कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही.केवळ पत्र व्यवहार करून दिवस काढण्याचे काम एमआयडीसी कार्यालयाकडून केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे पाटोद्याच्या विकासात खोडा निर्माण झाला आहे.उपअभियंता औरंगाबादहून चालवतात कारभारबीडच्या एमआयडीस कार्यालयाला पूर्णवेळ उपअभियंता नाहीत. विनायक मुळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मात्र, ते आठवड्यातून एक ते दोन वेळा हजेरी लावतात. औरंगाबादहूनच बीडचा कारभार हाकला जात असल्याने कामे रखडले आहेत. शिवाय नवीन कामे करण्याचे तर दुरच परंतु कारभारही सुधारला जात नसल्याचे दिसून येत आहे. उंटावरून शेळ्या राखण्याचे काम होत असल्यानेच पाटोदा एमआयडीसीचे काम रखडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :BeedबीडMIDCएमआयडीसी