शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

खराब बियाणांपोटी कंपनीला दंड; बीडच्या शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:14 AM

शेतात लावलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मंजूर करत संबंधित शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश देत ग्रीन गोल्ड कंपनीला पाच हजार रुपये दंड औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाने सुनावला.

ठळक मुद्देग्राहक आयोगाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतात लावलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मंजूर करत संबंधित शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश देत ग्रीन गोल्ड कंपनीला पाच हजार रुपये दंड औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाने सुनावला.

बीड तालुक्यातील पोथरा येथील शेतकरी अनंतराव हावळे व दीपक हावळे यांनी स्वत:च्या शेतात पेरण्यासाठी जे. एस. ३३५ सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. योग्य पावसाच्या वेळी, योग्य पद्धतीने पेरणी केली होती. पेरणीनंतर पंधरा दिवसात उगवण झाली नाही. त्यामुळे हावळे यांनी कंपनीकडे तक्रारही केली. मात्र कंपनीने दखल गेतली नाही. त्यामुळे शेतक-याने बियाणे तक्रार निवारण समिती व तालुका कृषी अधिकाºयांकडे धाव घेतली. त्यानंतर या समितीने तक्रारदार शेतक-यांच्या शेतजमिनीवरील सोयाबीनची पाहणी करुन बीज प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासणीसाठी बियाणे पाठवावे असा अहवाल दिला.

मात्र, कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा ग्राहक मंचकडे नुकसानीबाबत तक्रार करुन भरपाईची मागणी केली. शेतक-यांची तक्रार मंजूर झाली. जिल्हा मंचने दिलेल्या आदेशाच्या विरोधात औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठात अपील दाखल केले.

यात कंपनीचे वकील व शेतकºयांचे वकील अतुल हावळे यांचा आयोगापुढे युक्तीवाद झाला. या प्रकरणात शेतक-यामार्फत अ‍ॅड. अतुल हावळे व अ‍ॅड. योगेश बोबडे यांनी काम पाहिले.

९ टक्के व्याज देण्याचा आदेशआयोगाने शेतकºयाच्या शेतातील घटनास्थळाचा पंचनामा, शेतक-याचे किती नुकसान झाले व दरम्यानच्या काळात सोयाबीनला किती भाव होता याची शहानिशा करुन निकृष्ट व उगवण न झालेल्या बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकºयाला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचे आदेश दिले. तसेच बियाणे कंपनीला पाच हजार रुपये दंड सुनावला.