बीड : बीड पालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. मनमानी कारभार चालवितात, याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा व बांधकाम सभापतींनी सकाळी १०:३० वाजता मुख्य दरवाजा बंद करून पालिकेतील उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांची संख्या मोजली. यामध्ये सात विभागात केवळ शिपाई होते, तर दोन विभागाचे कुलूपच उघडले नव्हते. प्राप्त झालेल्या तक्रारींवर या आॅडिटमधून पालिकेतील गलथान कारभार चव्हाट्यावर आला.मागील काही दिवसांपासून बीड पालिकेत अधिकारी, कर्मचाºयांची मनमानी सुरू आहे. मनमानी कारभार चालविण्याबरोबरच कार्यालयीन वेळत येत नाहीत. तसेच कार्यालयात आल्यावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावली जात नाहीत, कामचुकारपणा करून कार्यालयातून काढता पाय घेतला जातो. हाच धागा पकडून काकू-नाना आघाडीचे नगरसवेक व बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल यांनी मंगळवारी सकाळी पालिकेत धाव घेतली. १०:३० वाजताच त्यांनी मुख्य दरवाजा बंद करून घेतला. यावेळी पालिकेत शुकशुकाट होता. ११ वाजेपर्यंत पाच-सात कर्मचारी दरवाजाजवळ आले. ११:३० वाजता पालिकेत अधिकारी, कर्मचाºयांची गर्दी वाढली. परंतु १०० टक्के उपस्थिती नव्हती.दरम्यान, नाईकवाडे व पटेल यांनी सुरूवातीला जन्ममृत्यू, आवक-जावक, अस्थापना विभागात पाहणी केली. यामध्ये केवळ आवक-जावक विभागातील महिला व कॅशिअर अमोल शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते सुवर्ण जयंती विभागात गेले. येथे महिला शिपाई दरवाजा उघडत होत्या. मलेरिया, महिला व बालकल्याण विभागातही हीच परिस्थिती होती. आरोग्य विभग कुलूपबंद होता. नगर रचना विभागतही सय्यद लईक उपस्थित होते. इतर गैरहजर होते. पटेल सभापती असलेल्या पाणीपुरवठा विभागात केवळ महिला शिपाई होत्या. तर नाईकवाडे सभापती असलेल्या बांधकाम विभागात दोन कर्मचारी व शिपाई हजर होत्या. लेखा विभाग शिपायावरच होता.विद्यूत विभागात सर्व कर्मचारी हजर होते. वसुली विभागातील कर्मचारी वसूलीला गेल्याचे सांगितले.
मुख्याधिकाºयांसमोर ठिय्या पालिकेतील गैरहजर अधिकारी, कर्मचाºयांचे आॅडिट करून सभापतींनी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडे धाव घेत ठिय्या मांडला. गैरहजर कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच यापुढे कार्यालयीन वेळेतच अधिकारी, कर्मचाºयांनी यावे, असे आदेश देण्याची मागणीही सभापतींनी केली. नगराध्यक्ष, सभापतींना सक्ती करा अधिकारी, कर्मचाºयांबरोबरच नगराध्यक्ष व सभापतींनाही आपल्या कक्षात बसण्यासंदर्भात बंधनकारक करावे. यासंदर्भात आम्ही सभेत आवाजही उठविला होता. परंतु नगराध्यक्षांनी याकडे डोळेझाक केली. यामध्ये कसलेही राजकारण नसून पालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी आम्ही हे आॅडिट केले. - अमर नाईकवाडे, फारूक पटेल,