लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. शिरूर येथे विजयी संकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते ,राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बीड येथे विजयी संकल्प मेळाव्यासाठी येणार असून, बीडमध्ये आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आपण सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करीत विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या मनमानी वाटचालीवर मुंडे यांनी टीका केली.अच्छे दिनची प्रतीक्षा करण्यात चार वर्ष निघून गेली. हाती काय लागले, असा सवाल करताच काही नाही, काही नाही, असेच उत्तर देण्यात आले. आता सत्तांतरासाठी तयार व्हा, असे आवाहन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला ,या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रोहिदास पाटील होते. अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, रवींद्र क्षीरसागर, शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, सतीश शिंदे, चंपावती पानसंबळ, कृष्णा पानसंबळ, गोकुळ सव्वासे आदी होतेप्रास्ताविकात महेबुब शेख यांनी शहराची सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अडवणुकीचा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर तालुका अध्यक्ष विश्वास नागरगोजे, सतीश बडे, रोहिदास पाटील, चंपावती पानसंबळ, बाळासाहेब आजबे सतीश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत स्थानीक आमदाराच्या कारभाराचा पाढा वाचला मात्र त्यांचे नांव सुध्दा घेण्याचे टाळले.रविंद्र क्षीरसागरा यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठक जिंकली. आता बीड येथे होत असलेल्या विजयी संकल्प मेळाव्यास शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आतापर्यतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.चूक झाल्यास ही शेवटचीच निवडणूकआता परिवर्तनाची वेळ आली आहे. सरकारने केलेली फसगत कोणी विसरणार नाहीत. मोदीजींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न करता शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची पिळवणूकच केली. नोटबंदी, कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान, जनधन खाते या सर्व बाबी सांगून पुन्हा ही चूक केल्यास ही निवडणूक कदाचित शेवटची ठरेल अशी शक्यता बोलून दाखवली.तुमच्या विहिरीतील पाण्याचासुध्दा सरकारला भरणा करावा लागेल. शेतात कोणते पीक घ्यायचे हे देखील विचारावे लागेल अशा स्वरूपाची वाटचाल सुरू आहे ती आम्ही कदापिही होऊ देणार नाही. पक्ष बदलणाºया स्वार्थी नेत्यांना सरडा म्हणणे देखील सरड्याचा अपमान ठरेल असे सुनावले.तुमच्या स्वार्थासाठी शहराला वेठीस धरू नका. जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. प्रतिवर्षी दोन कोटीचा रोजगार, बोंडआळीचे हेक्टरी ३४ हजार रुपयांचे अनुदान,कर्ज माफी या सर्व गोष्टी फसव्याच निघाल्याचे मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितल.े
जनतेच्या पदरी निराशाच-धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:35 AM
देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. शिरूर येथे विजयी संकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते ,
ठळक मुद्देएकहाती सत्ता असताना हाती काय लागले?