लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील १५ महिन्यांपासून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे खाजगी डॉक्टरांची दुकानदारी बंद पडत आहे. याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मिळत असलेल्या दर्जेदार सुविधा व उपचाराबाबतचा विश्वास यामुळेच प्रसुतीचा टक्का वाढत असल्याचे स्पष्ट होते.जिल्ह्यात नोंदणीकृत असे ४०० नर्सिंग होम आहेत. काही वर्षांपूर्वी या खाजगी रुग्णालयात प्रति महिना प्रसुतीची संख्या दीड ते दोन हजार होती. मात्र, हीच संख्या आता केवळ ५०० ते ८०० एवढी येऊन ठेपली आहे. जिल्हा रुग्णालयातील संख्या दोन हजारावरुन साडेतीन हजार एवढी झाली आहे. जिल्हा रुग्णालयात मिळत असलेल्या सुविधा व होत असलेले दर्जेदार उपचार यामुळे सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होऊन प्रसुती होणा-या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरिदास, डॉ. आय. व्ही. शिंदे यांच्याकडून प्रत्येक रुग्णाचा आढावा घेतला जातो. तसेच आलेल्या रुग्णावर तात्काळ व दर्जेदार उपचार करण्यासाठी आदेशित केले जात असल्याचे चित्र आहे.
शासकीय रुग्णालयामध्ये वाढतोय प्रसुतीचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:09 AM