या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. हर्षदा देशमुख (सहाय्यक प्राध्यापक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद) तर प्रमुख अतिथी म्हणून शुभांगी ढगे (जिल्हा मृद व सर्वेक्षण अधिकारी, बीड) या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. हनुमान गरुड (विशेषज्ञ कृषीविद्या) यांनी केले. तद्नंतर डॉ. हर्षदा देशमुख यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना कसा घ्यावा, त्या आधारित खतांचे व्यवस्थापन कसे करावे, पीकनिहाय शिफारशीत खतांची मात्रा कशी काढावी, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन कसे करावे, या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात शुभांगी ढगे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, त्यासाठी जिल्ह्यातील सर्व माती परीक्षण प्रयोगशाळांची माहिती दिली. त्याचप्रमाणे मृदा आरोग्य पत्रिकेबद्दल मार्गदर्शन केले. त्याचे महत्व सांगितले. तदनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. त्याचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमात ६०हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे हा प्रशिक्षण कार्यक्रम किसान ॲपच्या माध्यमातून झूम तसेच फेसबुक लाईव्हद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. डी. व्ही. इंगळे, कार्यक्रम सहायक संगणक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसान फोरमतर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला.