बीड : हॅलो सुनिता तुमचीच मुलगी का ? असा फोन गेल्यानंतर फडावर ऊस तोडणी करणारा पिता आश्चर्यचकित होतो. आपला नंबर या माणसाकडे कसा काय ? असा प्रश्न पडल्याने कुठून बोलता? कोण बोलतंय असा प्रश्न केल्यानंतर ‘मी तुमच्या मुलीच्या शाळेत आलोय, तुम्ही कोणत्या कारखान्यावर आहात? तुमची माहिती घ्यायाची होती. मी गावच्या शाळेत आलोय, तुमच्या मुलीशी बोला’ असे म्हणत शाळेत शिकणाऱ्या लेकीशी पित्याने संवाद साधला, चांगलं शिका म्हणत त्यानंतर हवी ती माहिती तपासणी करणाºया अधिकाºयालाही दिली. काही मिनिटांचा हा प्रसंग परंतु संवादात ख्यालीकुशाली विचारत बापलेक दोघेही सद्गदीत झाले होते. हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात लागू केलेल्या डीबीटी योजनेंतर्गत शनिवारी पडताळणी करण्यात आली, त्यावेळी असा अनुभव शाळेत शिक्षण घेणाºया मुलामुलींना व स्थलांतर करुन फडावर ऊस तोडणी करणाºया पित्यांना आला.स्थलांतर केलेल्या ऊसतोड मजुरांच्या गावातच नातेवाईकांकडे राहून शिक्षण घेणाºया पाल्यांना डीबीटी योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रीक उपस्थितीनुसार अनुदानाची रक्कम विद्यार्थी, पालक किंवा त्यांच्या संयुक्त खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी डीबीटी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी दिले होते. शिरुर तालुक्यात १५६ वसतिगृहांतील ४ हजार ५३ विद्यार्थी संख्येला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शनिवारी तपासणी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांचे पालक कोल्हापूर, कागल, सोलापूर, बारामती, सातारा तसेच इतर ठिकाणी व कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेल्याचे या तपासणीदरम्यान स्पष्ट झाले.
लेकीच्या शाळेतून फोन आला, फडावर बाप सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:29 AM
हॅलो सुनिता तुमचीच मुलगी का ? असा फोन गेल्यानंतर फडावर ऊस तोडणी करणारा पिता आश्चर्यचकित होतो. आपला नंबर या माणसाकडे कसा काय ? असा प्रश्न पडल्याने कुठून बोलता? कोण बोलतंय असा प्रश्न केल्यानंतर ‘मी तुमच्या मुलीच्या शाळेत आलोय, तुम्ही कोणत्या कारखान्यावर आहात? तुमची माहिती घ्यायाची होती. मी गावच्या शाळेत आलोय, तुमच्या मुलीशी बोला’ असे म्हणत शाळेत शिकणाऱ्या लेकीशी पित्याने संवाद साधला,
ठळक मुद्देहंगामी वसतिगृह योजना : शिरुर तालुक्यातील १५६ शाळांमध्ये एकाच दिवशी तपासणी; थेट खात्यात जमा होणार अनुदान