पालसिंगन, चांदेगाव व पोत्रा या ठिकाणी वाळू खदानी केल्या असून त्या भरून देण्यासाठी एक हजार रुपये वाळू माफिया घेतो. तसेच जेसीबीने भरून देण्यासाठी ५०० व अतिरिक्त ५०० असा एका ट्रॅक्टरला जवळपास दोन हजार रूपये खर्च येत असल्याचे चालक सांगतात. कुणाचे भय अथवा धाक राहिला नसल्याने वाळूचा अवैध उपसा बेसुमार सुरू आहे. जिल्ह्यांमधील पोलीस व महसूल प्रशासन फक्त गोदावरीकडे लक्ष ठेवून आहे परंतु त्यापेक्षाही दुप्पट तस्करी या घाटावर होते. दोन जिल्हे व तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर असल्यामुळे तसेच पालसिंगन, पोत्रा, चांदेगाव येथे जाण्यासाठी रस्ता खराब असल्यामुळे विशेष पथक तिकडे येत नाही. त्यामुळे प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसून येत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मात्र रस्त्यावर वाळू पसरल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.
वाळू वाहतुकीमुळे पिंपरी -नांदूरघाट रस्ता बनला धोक्याचा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:33 AM