खोडसाळपणा : दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल
दिंद्रुड : धारूर तालुक्यातील हिंगणी तलावातून शेतकऱ्यांनी पाईपलाईन जोडून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. हिंगणी येथील एका खोडसाळ व्यक्तीने ही पाईपलाईन फोडून शेतकऱ्यांचे नुकसान केले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
दिंद्रुड पोलिसात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
धारुर तालुक्यातील हिंगणी येथे मोठा तलाव आहे. या तलावातून कांदेवाडी, हिंगणी, मोहखेडसह आसपासच्या गावात शेतीसाठी पाणी पुरवले जाते. हिंगणी येथील किसनराव रामभाऊ सोळंके या खोडसाळ व्यक्तीने तलावातील विलास शिवाजी खाडे, प्रकाश रोहिदास कांदे, बंडू लक्ष्मण लटपटे, ज्ञानोबा अंबादास कांदे व फिर्यादी विष्णू प्रल्हाद खाडे यांची पाणी पुरवठासाठी टाकलेली पाईपलाईन गुरुवारी सकाळी फोडल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. जवळपास ७० हजार रुपयांचे नुकसान येथील शेतकऱ्यांना झाले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात दिंद्रुड पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, किसनराव रामभाऊ सोळंके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत नागरगोजे करत आहेत.
150721\3544sanotsh swami_img-20210715-wa0076_14.jpg