या रोडवरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. बीड कडा नगर हा पहिला राज्य महामार्ग होता. आता काही वर्षांपूर्वी याच रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, या रस्त्याचे कामदेखील काही ठिकाणी झाले. पण साबलखेड ते आष्टीपर्यंत काम रखडले असल्याने यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणता खड्डा किती मोठा याचा अंदाज येत नाही तर वाहनधारक सुसाट चालतात. त्यामुळे रोजच अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत. त्वरित खड्डे बुजवून त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अभियंता दिलीप तारडे यांना विचारले असता ते म्हणाले की, चार दिवसात हे खड्डे बुजवून दुरूस्ती केली जाईल.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनले अपघाताचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:33 AM