शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

नियोजित वधूचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:46 PM

स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली.

ठळक मुद्देपुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न। माजलगाव तालुक्यातील प्रकरण

बीड : स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली.९ जानेवारी २०१७ रोजी मयत मुलगी नामे सोनाली उर्फ रिंकू मोतीराम नाईकनवरे (वय १६) ही डोके दुखत असल्याने माजलगावातील एका नेत्रालयात आली होती. दुपारी २ च्या सुमारास प्रशांत तेथे आला. नंतर त्याने सोनालीला धारुर घाटातील बन्सीवाडी शिवारातील ओढ्याच्या कडेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून तसेच दगडाने गळ्यावर मारुन खून केला. तिचा मोबाईल बंद करुन सिदफणा नदीच्या पुलाखाली पात्रात फेकून दिले. गुन्हा करताना प्रशांतच्या सदऱ्यावर मयत मुलीच्या रक्ताचे डाग पडल्याने ते पाण्याने धुवून सदरा लपवून ठेवला. सदर मुलीचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करुन तिचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने अपहरण, खून तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. मोतीराम नाईकनवरे, पांडुरंग कुलकर्णी, प्रकाश नाईनवरे, नितीन पांचाळ, अनिल चुंबळे, पद्मिनबाई नाईकनवरे, डॉ. वाय. व्ही भगत, पोलीस उपनिरीक्षक विकास दत्ता दांडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. हरिबालाजी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात खून केल्याप्रकरणी जन्मठेप तसेच इतर कलमांतर्गत सात तसेच पाच वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. सरकार पक्षातर्फे माजलगाव येथील वरिष्ठ सहायक वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. रणजित ए. वागमारे, अ‍ॅड. बी. आर. डक तसेच पैरवी अधिकारी जालिंदर एस. वाव्हळकर यांनी सहकार्य केले.आत्महत्येचा केला होता बनावप्रशांत याची लग्न करण्याची इच्छा नसल्याने आणि लग्न न केल्यास गावात आपण राहू शकणार नाही त्यामुळे खून केला. सोनीलाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, वैद्यकीय अहवालात गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप