तालुक्यातील भाटेपुरी येथील पंचमुखेश्वर प्रतिष्ठानचे सदस्य नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यात त्यांनी भाटेपुरी गावात लोकसहभागातून जमा झालेल्या वर्गणीतून त्यांनी १७५ विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन वृक्षलागवड करण्यास खड्डा खंदून त्यात वृक्ष लावण्यास मदत केली. झाडांपासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात याची प्रतिष्ठानने माहिती सांगितली.
आपल्या गावातील वृक्षतोड थांबवली पाहिजे व कुणी कायद्याविरुद्ध जाऊन वृक्षतोड करत असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगितले. येथील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास पंचमुखेश्वर प्रतिष्ठानचे रामप्रसाद आडाळे, किशोर रहाडे, राहुल सागडे, करण आडाळे, दीपक सागडे, रामेश्वर नवले, आडाळे अनंता, विठ्ठल आडाळे, राहुल कल्याण सागडे, आडाळे हनुमान, उद्धव सागडे, आडाळे मुरली, अविनाश सागडे, आडाळे गणेश, बबलू सागडे, बालाजी आडाळे, अक्षय सागडे, प्रवीण आडाळेसह अनेक जण उपस्थित होते.