शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
3
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
4
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
5
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
6
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
7
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
8
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
9
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
10
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
11
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
12
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
14
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
15
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
16
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
17
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
18
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
19
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
20
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

धारुरच्या डोंगरावर सीताफळाच्या बियांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:21 AM

धारूर : सीताफळाच्या बियांची लागवड करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व कृषी अभ्यासाक डॉ.बी.के. ठोंबरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ...

धारूर : सीताफळाच्या बियांची लागवड करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व कृषी अभ्यासाक डॉ.बी.के. ठोंबरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कायाकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अंबाचंडी रस्त्यावर श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. डोंगर परिसरात सीताफळ बियांची लागवड करण्यात आली.

धारुर तालुका सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून वृक्षतोडीमुळे सीताफळाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. सीताफळ लागवड किंवा सीताफळ बियांची लागवड होत नसल्याने, परिसरातील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेण्यासाठी डॉ.बी.के .ठोंबरे यांनी आवाहन केले होते. धारुर परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये, शेतात बांधावर व मोकळ्या जागेत बिया टाकून सीताफळांच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची संकल्पना मांडत, डॉ.ठोंबरे यांनी सीताफळ बिया उपलब्ध करत, स्वत: सीताफळ बियांची लागवड सुुरू केली. त्यांच्या उपक्रमाला शहरातील विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळ व युवकांनी चांगला प्रतिसाद देत, सीताफळ बियांची लागवड करण्यास प्रारंभ केला.

शहरातील प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह दिख्खत, सराफ व्यापारी महेश चिद्रवार, अमोल थोरात यांच्या उपस्थितीत अंबाचंडी रस्त्यावर श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर डोंगर परिसरात सीताफळांच्या बियांचे रोपण करण्यात आले.

या मोहिमेत शाकेर सय्यद , कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, कैलास बोरगावकर, जलदूत विजय शिनगारे, अथर्व कामाजी आदींसह तरुण व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

110721\img-20210711-wa0051.jpg~110721\img-20210711-wa0071.jpg

धारूर परीसरातील उजाड डोंगरावर सिताफळ बिया लावताना~धारूर परीसरातील डोंगरावर सिताफळाचे बिया लावताना