लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरु झाली. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत नगर पालिकेच्या दोन पथकांनी १५ विक्रेत्यांवर कारवाई करीत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याप्रकरणी १४ विक्रेत्यांना प्रत्येकी ५० रुपये, तर एकाला ५०० रुपये दंड आकारला.प्लास्टिक बंदीबाबत प्रसारमाध्यमातून माहिती होऊनही अनेक जण कमी - अधिक जाडीच्या पिशव्या वापरताना दिसून आले. मात्र अनेक जण नेहमीप्रमाणे कापडी पिशव्यांचा तसेच नॉयलॉन वायरच्या पिशव्यांचा वापर करताना दिसून आले. सकाळी नगर पालिकेच्या पथकाने शहरातील भाजीमंडई, बसस्थानक, सुभाष रोड, शाहूनगर विविध भागात फिरून विक्रेत्यांकडे तपासणी केली. कॅरीबॅगचा वापर करताना आढळलेल्या विक्रेत्यांना पहिला दिवस म्हणून ५० रुपये दंड आकारला. तसेच यापुढे दंडाची रक्कम ५०० रुपयांच्या पुढे असेल असे बजावण्यात आले. एका विक्रेत्याला मात्र ५०० रुपये दंड आकारला. कारवाया सुरु होतात काही तासातच विक्रेत्यांकडील हलक्या प्रतीच्या कॅरी बॅग गायब झाल्या. शहरातील प्लास्टिकची दुकाने बंद होती.बीड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक विश्वंभर तिडके, रुपकांत जोगदंड, भागवत जाधव, सुनील काळकुटे, अमोल शिंदे, भारत चांदणे, महादेव गायकवाड यांचे एक पथक तर अभियंता भंडारी यांच्या नेतृत्वाखालील आठ जणांचे दुसरे पथक अंमलबजावणीसाठी दिवसभर तपासणी करत होते.माजलगाव शहरातील नागरिक मात्र प्लास्टिक बंदीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. परळीमध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे बंदी असलेल्या साहित्याचा वापर हॉटेल आणि छोट्या विक्रेत्यांकडे दिसून आला. अंमलबजावणीसाठी ६ पथके नियुक्ती केल्याचे ओ.एस. संतोष रोडे, एस. आय. श्रावणकुमार घाटे, शंकर साळवे यांनी दिली.केजमध्येही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
प्लास्टिक गायब; कापडी पिशव्या बाहेर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:41 AM
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरु झाली. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत नगर पालिकेच्या दोन पथकांनी १५ विक्रेत्यांवर कारवाई करीत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याप्रकरणी १४ विक्रेत्यांना प्रत्येकी ५० रुपये, तर एकाला ५०० रुपये दंड आकारला.
ठळक मुद्देप्लास्टिक बंदीचा पहिला दिवस : बीडमध्ये १५ जणांना दंड; धारूर पालिका करणार आधी जनजागृती