लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : सूक्ष्मसिंचन योजनेचे २०१३-१४ या वर्षातील प्रलंबित अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी तालुका कृषी कार्यालयावर पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील शेतकºयांनी २०१३-१४ मधील सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान मागील तीन वर्षांपासून मिळत नाही. याबाबत वारंवार निवेदन देउनही कृषी कार्यालयाकडून दखल घेण्यात येत नाही. २८ जून २०१८ रोजी ही निवेदन देण्यात आले होते तरी देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी तालुका कृषी कार्यालयावर ढोल बजाओ आंदोलन शेतकºयांच्या वतीने करण्यात आले.पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नाही. गेंड्याची कातडी ओढलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जाग येण्यासाठी शेतकºयांनी आगळेवेगळे आंदोलन केले आहे. निवेदनावर परमेश्वर डाके, दीपक डाके, गणेश डाके, नंदाबाई डाके, ़ित्रंबक डाके, विलास डाके यांच्या स्वाक्षºया आहेत.
कृषी कार्यालयावर ढोल बजाओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:00 AM
सूक्ष्मसिंचन योजनेचे २०१३-१४ या वर्षातील प्रलंबित अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी तालुका कृषी कार्यालयावर पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले
ठळक मुद्देपिंपरी खुर्दचे शेतकरी आक्रमक : सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान देण्याची मागणी