धारूर (जि. बीड) : तालुक्यात डोंगरपट्ट्यात सिंचन प्रकल्पामुळे पाणीसाठे तयार झाले आहेत. त्यामुळे पक्षी व प्राण्यांचा अधिवास या भागात वाढत आहे. वेगवेगळ्या जातींचे दुर्मिळ पक्षी आढळून येतात. पक्षी सप्ताह साजरा होत असताना पक्षी आणि प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेची असल्याचा सूर पक्षी मित्रांमध्ये उमटत आहे.
धारूर वन परिक्षेत्राचे कार्यक्षेत्र हे सर्व डोंगराळ आहे. या भागात पक्षी व प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तीव्र टंचाईच्या काळात पक्षी व प्राण्यांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे इतरत्र स्थलांतर होत असे. मागील दहा वर्षांत या डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प, पाण्याचे साठे झाल्याने विविध जातींच्या व दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्याचे प्रमाण वाढले आहे. मोर, चिमणी, पोपट, लांडोर आदी पक्ष्यांची संख्या वाढली असून, हे पक्षी सकाळी व संध्याकाळच्या वेळी पाण्याच्या ठिकणी येतात.
पाणवठ्याच्या परिसरात पाऊलखुणापाणवठ्याच्या परिसरात पाऊलखुणा दिसतात. वन विभागाच्या पशू व प्राणी गणनेच्या निरीक्षणातून पक्षी व प्राणीसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर या काळात राज्यात साजरा केला जात आहे. या सप्ताहापासून पक्षी व प्राणी संरक्षणासाठी उपाययोजना व्हावी म्हणून विशेष मोहीम राबविणे आवश्यक असून, पक्षीप्रेमी तसा संकल्प करीत आहेत.