जीर्ण तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युत खांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर फेकले जातात मास्क
बीड : शहर व परिसरात रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलेले मास्क पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनाही याचा संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी रस्त्यावर वापरलेले मास्क टाकू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.