अविनाश कदम
आष्टी : कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद आहेत. भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना शेतात पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकतो; पण विकत नाही. या नैराश्यातून सोमवारी अनिकेत मोकासे या तरुण शेतकऱ्याने पिकवलेल्या वांग्याच्या प्लाॅटवर ट्रॅक्टरच्या साह्याने नांगर फिरवला आहे.
पारगाव जोगेश्वर शेतकरी अनिकेत मोकासे यांनी एका अर्धा एकरवर वांग्याचे पीक घेतले होते. वांगी पीक चांगले बहरले होते. उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता असतानाही वांगी पीक जपले. वांग्याच्या झाडाला वांगी चांगली लगडली होती; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. आठवडी बाजार बंद झाले. यामुळे वांग्याला भाव राहिले नाहीत. या वांगी पिकांपासून मोकासे यांना ५० ते ८० हजारांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु सध्या वांग्याचे कॅरेट ५० ते ६० रुपयांना विकत आहे. त्यामुळे पदरमोड करून वाहतुकीचा खर्चही मिळत नाही. या शेतकऱ्याने उभ्या वांग्याच्या प्लाॅटमध्ये ट्रॅक्टर फिरवला आहे.
...
भाजीपाला न पिकवलेला बरा
लॉकडाऊनमुळे शेतकरी भाजीपाला शेतातच फेकून देत आहेत, तर काही शेतात जनावरांना पीक चारत असल्याचे दृश्य दिसत आहेत. माल पिकला तर विकत नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. तोडणीचा खर्च, वाहतूक करण्यासाठी लागणारा खर्च निघत नाही. स्वतःच्या खिशातून मजुरांचा खर्च द्यावा लागतो. त्यामुळे माझे अर्धा एकर असलेल्या वांग्याच्या प्लाॅटमध्ये नांगर फिरवला आहे. यामुळे भाजीपाला न पिकवलेला बरा.
-अनिकेत मोकासे, शेतकरी, जोगेश्वरी पारगाव, ता. आष्टी.
===Photopath===
110521\img-20210511-wa0202_14.jpg