बीड : पंतप्रधान पीक विमा योजना २०१८ मधील पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करुन दिल्लीस्थिती प्रधान कार्यालयाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना दावा मिळणे योग्य आहे त्यांच्या दाव्याचे ४५ दिवसांत वाटप करणार असल्याचे दि. ओरिएन्टल विमा कांपनीचे उप महाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे व शिष्टमंडळाला सांगितले.२०१८ मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकºयांपैकी जवळपास सव्वालाख शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयास भेट देऊन उप महाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांना निवेदन दिले.शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झाला आहे. चार दिवसांपूर्वी नि. टाकळी येथे शेतक-याने आत्महत्या केली. दुसरीकडे ८००० देऊन शेतक-यांची थट्टा चालवली आहे. त्यात मागील वर्षीचा विमा अद्यापही १ लाख २५ हजार शेतकºयांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत विमा कंपनीने शेतकºयांच्या वेदना समजुन मागील वर्षीचा विमा तात्काळ वर्ग करण्याची मागणी गंगाभिषण थावरे यांनी यावेळी केली. चर्चेनंतर कंपनीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या एनसीआयपी पोर्टलवर बॅँकेकडून किंवा सीएससी सेंटरकडून भरण्यात आलेली माहिती अथवा कागदपत्रांचे अपलोडिंग व्यवस्थित न केलेल्या शेतक-यां बाबतीत प्रधान कार्यालय व केंद्र शासनाकडून निर्णय मागितला आहे. मात्र चुकीचे प्रकरण मंजूर होणार नसल्याचे संकेतही देण्यात आले आहे.
पंतप्रधान पीकविम्याची रक्कम त्रुटी दुरुस्त करून ४५ दिवसांत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:55 PM
पंतप्रधान पीक विमा योजना २०१८ मधील पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करुन दिल्लीस्थिती प्रधान कार्यालयाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना दावा मिळणे योग्य आहे
ठळक मुद्देरखडलेला विमा : गंगाभिषण थावरे पुण्यात उपमहाप्रबंधकांना भेटले