शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बीडमध्ये प्रधानमंत्री आवासचे काम असमाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:29 PM

‘सर्वांसाठी घरे’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, बीड शहरात याची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांची नाराजी : बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून मागविला खुलासा

बीड : ‘सर्वांसाठी घरे’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, बीड शहरात याची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या निमित्ताने पालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.२०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. एका खाजगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून किती लोकांना घराची आवश्यकता आहे, याची माहिती घेण्यात आली. तसेच अर्जही मागविण्यात आले. बीड पालिकेला ५ हजार ७९२ घरांचे उद्दिष्ट आहे. यासाठी आतापर्यंत ७ हजार ९०० अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या पत्रानुसार आतापर्यंत २२०८ घरांचा डीपीआर मंजूर झाला आहे. पैकी केवळ ६४ घरांचेच काम सुरू झाले आहे. हाच धागा पकडून विभागीय आयुक्तांनी आढावा घेत बीड पालिकेच्या मुख्याधिकाºयांची कानउघडणी केली आहे.पत्र पाठवुन नाराजी व्यक्त करीत उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलून तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, लाभार्थ्यांना अडीच लाख रूपयांपर्यंत अनुदान दिले जाते. बेसमेट लेव्हलला बांधकाम झाले की पहिला ४० हजार रूपयांचा हप्ता दिला जातो. बांधकाम सुरू झाल्यावर ६० हजार, स्लॅब पडल्यावर एक लाख, प्लास्टर करायच्यावेळी राहिलेली ५० हजार रूपयांची रक्कम दिली जात असल्याचे संबंधित कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ८३ लोकांना पालिकेने पहिला हप्ता दिल्याचे सांगण्यात आले आहे.मार्च २०२० पर्यंत २८९५ उद्दिष्टबीड पालिकेला ३१ मार्च २०२० पर्यंत २ हजार ८९५ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप २२०८ घरांचा डीपीआर मंजूर झाला आहे.राहिलेल्या ६८७ घरांचे तीन महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. अन्यथा आयुक्तांकडून होणाºया कारवाईस तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना