परळी : मंगळवारी दिवसभर परळी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीतील सोयाबीन व कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी तहसीलदार सुरेश शेजूळ व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पोळ, सरपंच नितीन काकडे, सुभाष नाटकर यांनी कासरवाडी ते पोहनेर पाण्यात चपूवर बसून पोहनेर येथील लोकांशी संपर्क केला. या परिसरातील सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
...
पावसामुळे परळी तालुक्यातील सर्वच पुलांवरून पाणी वाहिले. त्यामुळे काही वेळ वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. बुधवारी ही व्यवस्था पूर्ववत सुरू झाली. मालेवाडी, लेंढेवाडीसह अनेक शिवारातील शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- राजवर्धन दौंड, दौंडवाडी, ता. परळी.
..
ज्या ज्या शिवारात शेतीचे नुकसान झाले, त्या त्या ठिकाणची तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पाहणी केली जाईल.
-सुरेश शेजुळ, तहसीलदार, परळी वैजनाथ.
...
080921\img_20210908_170839_14.jpg