शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पोलिसांना माणुसकी भोवली; हातकडीसह आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:03 AM

थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले.

ठळक मुद्देदहा तासांत पुन्हा गजाआड : थंडीने डोळे पांढरे केल्याने न्यायचे होते रूग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/धारूर : थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले. त्यानंतर दहा तासांत पुन्हा त्याला गजाआड केले. केवळ माणुसकी पोटी त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या चांगलाच अंगलट आल्याचे यावरून दिसते.धनराज डोंगरे (२५ रा.पिंपरवाडा ता.धारूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केला होता. धारूर ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. त्याला २९ तारखेला अटक केली. न्यायायालने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रविवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रूग्णालयात नेले. डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे सांगितले. कोठडीत त्याला पांघरूनही दिले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास त्याने डोळे पांढरे करायला सुरूवात केली.पहारेकरी पोना दिगंबर गिरी यांनी त्याला बाहेर काढले. लॉक लावत असतानाच धनराज त्यांना हिसका देत हातखडीसह पलायन केले. गिरी यांनी इतरांना आवाज देण्यापूर्वीच त्याने अंधारातून गायब झाला. रात्रभर धारूर पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. सकाळी तो आसोला येथील नातेवाईकाकडे तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे त्याला सापळा लावून सकाळी पुन्हा गजाआड केले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.पहारेकऱ्यांची होणार चौकशीपोना गिरी यांच्या माणुसकीचा धनराजने फायदा घेतला. आता गिरी यांना वरिष्ठांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनीही याला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग