माजलगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी लागू असताना शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा लोकांची पोलिसांनी नाकेबंदी करून चौकशी करणे सुरू केले आहे. दरम्यान सबळ कारण नसताना फिरणाऱ्या ३५ जणांना दंड अकारण्यात आला.
जमाव बंदी, संचारबंदी आदेशाची पायमल्ली करत शहरात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. तर विनाकारण वाहनांवरून तसेच विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात माजलगाव नगर परिषद व शहर पोलिसांच्या वतीने शहराच्या प्रवेशस्थळासह शिवाजी चौक, आंबेडकर चौक या भागात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान सबळ कारण नसणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत ३५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना यावेळी नगर परिषद, पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपापल्या दुकानासमोर मेन कापडाची जाळी वापरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
मोंढ्यात अनेक पत्राची, इलेक्ट्रॉनिक दुकाने उघडी दिसून येत होती, तर जनरल स्टोअर्स चालकांनी वेगळीच शक्कल लढवली. कानासमोर बिस्किटचे बॉक्स ठेवून आतमध्ये जनरल स्टाेअर्समधील सामानांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत होते. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना याबाबत सांगूनही त्यांनी यांच्या विरोधात काहीच कारवाई केली नाही. यामुळे इतर व्यापाऱ्यांचा पोलिसांविरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे.
===Photopath===
160421\purusttam karva_img-20210416-wa0032_14.jpg