बीड : एकाच दिवशी आपल्या साथीदारांसह चार ठिकाणी रोडरॉबरी करुन लाखोंचा ऐवज लंपास करणाºया टोळीचा म्होरक्या विलास बडे रविवारी सायंकाळी धारुर पोलीस ठाण्यातून पळाला. या घटनेने ठाण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
विलास बडे, बाळू पवार व गणेश बडे अशी तिघांची टोळी होती. हे तिघे निर्जनस्थळी उभा राहून रस्त्यावरुन ये-जा करणाºया वाहनधारकांसह पादचाºयांना चाकू, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करीत होते. बीडसह पुणे, अहमदनगर, बुलडाणा आदी जिल्ह्यात या तिघांनी धुमाकूळ घातला होता. गत महिन्यातच बीड तालुक्यातील नेकनूरजवळ दाम्पत्याचे अपहरण करुन त्यांना मारहाण करीत हजारोंचा ऐवज लंपास केला. त्यानंतर युसूफवडगाव व धारुरमध्येही त्यांनी रोडरॉबरीचे तीन गुन्हे केले.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. अवघ्या २४ तासात स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व नेकनूर पोलिसांनी बाळू पवार व गणेश बडेच्या येळंबघाटमध्ये मुसक्या आवळल्या, तर विलास बडेच्या शोधार्थ पथके रवाना झाली होती. परंतु तो हाती लागला नव्हता.
दरम्यान, विलास बडेला पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. त्यावर बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याने बीड जिल्हा पोलिसांनी त्याला पुण्याहून आणले. धारुर पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आले होते. पोलिसांची नजर चुकवून रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याने ठाण्यातून धूम ठोकली. ही घटना वाºयासारखी जिल्ह्यात पसरली. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.पोलिसांना हलगर्जीपणा भोवतोयदोन आठवड्यापूर्वीच बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून एका संशयित आरोपीने धूम ठोकली होती. यामध्ये सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यातून पोलीस काही धडा घेतील असे अपेक्षित होते. मात्र, धारुरच्या घटनेने हा अंदाज चुकीचा ठरवला आहे.
तपास घेतला जाईलआरोपी पळून गेला आहे. धारुरसह इतर ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल होते. यासाठी त्याला पुण्याहून आणले होते. या घटनेचा तपास घेतला जाईल.- अजित बोराडेअपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई