लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाव गेवराई तालुक्यातील तळेवाडी... वेळ सायंकाळी ६ वाजण्याची... लग्न मंडपात वºहाडी मंडळी बसलेली... परण्या मंडपाच्या दिशेने येत होता... सर्व तयारी पूर्ण झालेली असतानाच गेवराई पोलीस धावले आणि अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. पोलिसांनी तत्परता तर दाखविलीच शिवाय नातेवाईकांचे समुपदेशनही केले. आलेले वºहाडी मंडळी जेवण करून परतली.
गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेणा-या मुलीचा विवाह बीड तालुक्यातील आडगाव येथील तरूणासोबत निश्चित झाला होता. पत्रिका छापल्या. वधूपित्याने लग्नाची सर्व तयारी केली होती. भांडे, आहेर घेण्याबरोबच बँडबाजा, मंडप, जेवणाचे नियोजन केले होते. १२ मार्च सायंकाळी ६ वाजता लग्नाची वेळ होती. सर्व तयारी झाली होती. एवढ्यात गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या विवाहाबाबत खब-यांकडून माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ धाव घेत खात्री करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. परंतु पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता, या वधू मुलीचे वय केवळ १३ वर्षे ८ महिने असल्याचे समोर आले.
आहेर यांनी वधू व वराकडील नातेवाईकांना बोलावून घेत समुपदेशन करीत कायद्याची माहिती दिली. नातेवाईकांना हे मान्य झाल्यानंतर आम्हाला कायद्याचे ज्ञान नसल्याने आम्ही हा विवाह लावून देत होतो.आता १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचा विवाह करणार नाहीत, असे त्यांनी लेखी दिले. ही वार्ता वाºयासारखी पसरल्यावर थोडा गोंधळ उडाला होता. परंतु सर्वांची समजूत काढण्यात आली. आलेल्या सर्व वºहाडी व पाहुण्यांना जेवण करून रात्री उशिरा रवाना करण्यात आले.मुलगा व नातेवाईक निघून गेलेहा सर्व प्रकार माहिती झाल्यावर वर मुलगा व त्याचे काही नातेवाईक लग्न मंडपातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. इतर वºहाडींना मात्र जेवण करून रवाना करण्यात आले.