पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र राव पवार यांनी सराव घेतला आहे. यात सर्व पोलीस कर्मचारी व महिला कर्मचारी देखील सहभागी होत्या. नियमांची अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था राखली जावी, उपद्रवींना वचक व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अभय देण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांवर असते, त्याचे भान ठेवूनच कवायत सराव सुरू केला आहे. ढालीवरील व काठीवरील धूळ झटकून आता सराव सुरू केला आहे. हा सराव पाहता पोलीस सर्व तयारीनिशी असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मोठे कार्यक्रम करू नयेत, असे निर्बंध घालतानाच मोजक्याच उपस्थितीत ते पार पाडावेत, अशा सक्त सूचना दिल्या जात आहेत. पूर्वाश्रमीचा अनुभव व कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शांतता व सुव्यवस्था या गोष्टींसाठी व येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस तत्पर असल्याचे सांगून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने व सहायक पोलीस निरीक्षक डॉ .रामचंद्र पवार यांनी केले आहे.
===Photopath===
030321\03bed_13_03032021_14.jpg