धारूर तालुक्यातील एका जवानाला सायबर भामट्याने चार दिवसांपूर्वी ऑनलाईन गंडा घातला. त्यांना अंबाजोगाई येथे असताना भामट्याने कॉल केला व ॲप डाऊनलोड करायला सांगून फसवणूक केली. त्यांचे खाते धारूर येथील बँकेत आहे. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी त्यांना अंबाजोगाई येथून धारूरला पाठविले.
_
तक्रार नोंदवलीच नाही
अंबाजोगाई येथून बीडला बसमध्ये निघालेल्या महिला प्रवाशाची व्यथा त्याहून वेगळी. त्यांच्या बॅगेतील दागिने चोरट्यांनी लांबविले. बीडमध्ये पोहोचल्यावर ही बाब निदर्शनास आली. मात्र, वाटेत लागणाऱ्या पाच पोलीस ठाण्यांपैकी कुठल्या हद्दीत गुन्हा घडला या मुद्द्यावरून त्यांची तक्रारच नोंदवून घेतली नाही.
__
हे नव्हे ते पोलीस स्टेशन
शहराजवळ बाहेरच्या जिल्ह्यातील एका कारचा अपघात झाला. त्यामुळे चालक पोलीस ठाणे शोधत शिवाजीनगर ठाण्यात कसाबसा पोहोचला. मात्र, त्याचे म्हणणे देखील ऐकून न घेता त्यास बीड ग्रामीण ठाण्याची वाट दाखविण्यात आली. त्यामुळे कारचालकास बीड ग्रामीण ठाण्यात जावे लागले.