कुसळंब : रस्ता सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वखर्चातून अपघात टळावेत यासाठी रिफ्लेक्टर सह विविध सुविधा वाहनांना देऊन एक आदर्श निर्माण केला आहे
१७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान शासन आणि विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा हेतू 'नियम पाळा अपघात टाळा' या अनुषंगाने आहे. पाटोदा पोलीस ठाणे अंतर्गत असलेले पोलीस कॉन्स्टेबल एम.बी.क्षीरसागर यांनी आपल्या अंतर्मनातील सामाजिक जागृत भूमिका व्यक्त केली आहे.
स्वखर्चातून त्यांनी वाहनांसाठी रिफ्लेक्टर बसवले आहेत. ज्या ठिकाणी वळण रस्ता आहे आणि चौकाची ठिकाणी आहेत अशा ठिकाणी रेडियमचे विविध मार्गदर्शक बाण दाखवण्यात आले आहेत. दिशादर्शक फलक तसेच अशा प्रकारचे विविध वाहनांना आवश्यक असणाऱ्या आणि चालकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबी स्वतःला झेपेल एवढ्या खर्चातून स्वतः एम.डी. क्षिरसागर यांनी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाटोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे व एपीआय धरणीधर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांसाठी या सुविधा वाहतूक पोलीस कर्मचारी एम. बी. क्षीरसागर यांनी उपलब्ध केल्या आहेत.
एकूणच सदैव टिकेचे धनी ठरलेल्या वाहतूक पोलिस विभागासाठी पो. कॉ. क्षीरसागर यांचे हे नि: स्वार्थ काम सकारात्मक दिशा देणारे आहे.