अनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला. बऱ्याच दिवसानंतर हे दोन राजकीय पक्के विरोधक एकत्र आल्याने चर्चेचा विषय ठरला. निवडणुकीच्या तोंडावर हा दुरावा कमी होणार का याची चर्चा होत आहे.तालुक्यातील आसरडोह येथे आसरादेवीची यात्रा होती. या यात्रेत सोमवारी कुस्त्याची दंगल होती. या मैदानावर,आकर्षण ठरले ते दोन दिग्गज राजकीय विरोधक या कुस्तीच्या फडावर एकत्र आले होते. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर दोन वर्षात प्रथमच भाजपाचे युवक नेते रमेशराव आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे एकत्र आले होते. यावेळी जि.प चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख हे ही उपस्थित होते .आडसकरांचा बालेकिल्ला समजल्या जाणाºया आसरडोह गटातील कार्यक्र मास हे हे दोन दिग्गज ब-याच दिवसानंतर एकत्र आल्याने सर्वांसाठी हे आकर्षण होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोन राजकीय विरोधक एका फडावर एकत्र आल्याने नवीन राजकीय समीकरण काही होतंय का, अशी शंका येत आहे.रमेश आडसकर व बजरंग सोनवणे यांच राजकीय वैर सर्व जिल्ह्याला माहीत आहे. आडसकराच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी बंजरंग सोनवणे यांच्यामागे ताकद उभी केली. जि.प. निवडणुकीत चिंचोलीमाळी व युसूफवडगाव गटात आडसकर विरूध्द सोनवणे अटीतटीची लढत झाली. चिंचोलीमाळी गटात बजरंग सोनवणे विरूध्द रमेश आडस कर यांचे पुतणे ऋषिकेश आडसकर अशी लढत होऊन सोनवणे विजयी झाले. युसूफवडगाव गटात सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे व आडसकरांच्या पत्नी अर्चना आडसकर यांच्यात लढत झाली. येथे सारिका सोनवणे विजयी झाल्या होत्या. या दोन्ही नेत्यांनी येथे विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात सोनवणे यांनी दोन्ही गटांत विजय मिळवला होता.
राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:59 PM
तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला.
ठळक मुद्देआसरडोहमध्ये एकत्र : सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या