शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:09 AM

बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना देखील झाले आहेत.

बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना देखील झाले आहेत. मतदारांनीही शांततेत मतदान करुन प्रशासनास सहकार्य करावे. प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर हे उपस्थित होते.यावेळी पाण्डेय म्हणाले की, निवडणूक रिंगणात ३४ उमेदवार पुरुष व दोन उमेदवार महिला आहेत. ९३०० अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर नियुक्त केले आहेत. ९५२ राखीव कर्मचारी आहेत. मतदारसंघात २३११ मूळ मतदान केंद्रे, तर १४ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. शहरी भागात ७६१, तर ग्रामीणमध्ये १५६४ मतदान केंद्रे आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघात ३९६, माजलगाव ३७४, बीड ३७१, आष्टी ४३८, केज ४०७ आणि परळी विधानसभा मतदार संघात ३३९ मतदान केंद्रे आहेत. मतदारांची संख्या २० लाख ४१ हजार १८१ आहे.११०९ मतदान केंद्रांमध्ये ४ हजार ३५७ अपंग मतदार आहेत. आष्टीमधील सिदेवाडी या मतदान केंद्रावर संपूर्ण कर्मचारी हे दिव्यांग आहेत. महिला कर्मचाऱ्यांद्वारे संपूर्ण महिला सखी मतदार केंद्र तयार केले आहे, तर दिव्यांगांसाठी स्वावलंबी मतदान केंद्र निर्माण केल्याची माहिती पाण्डेय यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019