शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:49 AM

पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दूसºया टप्प्यात जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत १६४ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १४८८ सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान मंगळवारी झाले. सकाळी सात वाजेपासूनच केंद्रांवर हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यासन, या निवडणुकीत चार ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तर दोन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.नेकनूरमध्ये गोंधळबीड तालुक्यातील नेकनुर येथील मतदान केंद्रावरील एका मशीनमध्ये सकाळी बिघाड झाली होती. त्यानंतर तात्काळ निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी धाव घेत यंत्र दुरूस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. दरम्यानच्या काळात थोडा गोंधळ उडाला होता. तसेच धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे संथगतीने प्रक्रिया चालल्याने रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते तर भोगलवाडी, हिंगणा येथे मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच आडसमध्येही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.आष्टीत जास्तमतदानआष्टी तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वाधिक ८१ टक्के (दुपारी साडेतीन पर्यंत) मतदान झाले. तर धारूर तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी केवळ ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण ६९.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.तरूणांचा उत्साहआपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाºया तरूणांची गर्दी दिसून आली. त्यांचा उत्साह चेहºयावर स्पष्ट दिसत होता. तर वृद्धांनीही नातेवाईकांचा आधार घेत मतदान केले.चोख बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी प्रत्येक केंद्राचा आढावा घेत होते.