शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

सार्वजनिक शौचलयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:35 AM

------------- महिला बचत गट आर्थिक संकटात अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना ...

-------------

महिला बचत गट आर्थिक संकटात

अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना केली. परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचत गटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या. तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचत गट आर्थिक संकटात सापडले आहे.

---------------

शेतकरी कर्ज माफीच्या लाभापासून वंचित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ लवकर मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.

------------

तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वाद विवाद उद्भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोझवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते. परंतु प्रत्यक्ष कामाकडे मात्र, या समितीतील सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.

-------------------------------

कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृती सुरू

अंबाजोगाई : पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात गावावांगावात शेतकऱ्यांना माहिती देण्याची मोहीम गेल्या आठवडाभरापासून राबविण्यात येत आहे.

--------------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने प्रदूषणात भर

अंबाजोगाई : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला.

--------------------------------------

गढूळ पाण्याने नागरिक हैराण

अंबाजोगाई : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र शहरातील विविध वॉर्डात आजही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आहे. शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुलभा सोळंके यांनी केली आहे.