बीड : प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक्केच काम जिल्ह्यात झाले आहे.जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार २३५ लाभार्थी आहेत. पैकी आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार ४७५ लाभार्थ्यांनी ई-कार्ड घेतले असून प्रत्यक्षात १ लाख ३४ हजार ४८ लोकांना कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे. दहा महिन्यांपासून सुरू झालेल्या योजनेची अद्यापही नागरिकांना माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १०० टक्के काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ २३ टक्केच काम झाल्याचे समोर आले आहे. गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी विविध योजना व मोहिमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आयुष्मान भारतची कामगिरी पाहून नाराजी व्यक्त करीत आरोग्य व गटविकास अधिकाºयांना सुचना केल्या. तसेच नागरिकांनीही गावातील शासनमान्य महा ई सेवा केंद्रावर जावून नाव नोंदणी करून कार्ड घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नियूक्त खाजगी रूग्णालये, सरकारी रूग्णालयांमध्ये नोंदणी मोफत आहे. आपले सरकार व इतर ठिकाणी ३० रूपये देऊन नोंदणी केली जाते.प्रत्येक गुरूवारी ग्रामपंचायत स्तरावर शिबीरे आयोजित करावे, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेशही कुंभार यांनी दिले आहेत. तसे पत्रही सर्वच गटविकास अधिकाºयांना काढले आहेत. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवारसह इतर अधिकारी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आढावा घेतला. माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार. यावेळी उपस्थित इतर अधिकारी.१३०० आजारांचा समावेश१ एप्रिल २०१८ पासून देशात आयुष्यमान भारत ही योजना लागू केली. या आगोदर महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे.सध्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही योजना एकत्रिपणे राबविल्या जात आहेत. दोन्ही योजनेत तब्बल १३०० आजारांचा समावेश केलोला आहे.फुले योजनेंतर्गत दीड लाखापर्यंत तर आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रूपयांपर्यंत उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी काही निकष ठरवून लाभार्थी निवडले आहेत.
‘आयुष्मान भारत’ची बीडमध्ये खराब कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:05 AM
प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक्केच काम जिल्ह्यात झाले आहे.
ठळक मुद्देसीईओंचे बीडीओंना पत्र : १० महिन्यात केवळ २३ टक्के काम पूर्ण