बीड : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या जिल्हा परिषदेच्या ४३ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कोविड-१९ चे नियम पाळून बीड येथील स्काउट भवनात आंतरजिल्हा बदली पदस्थापना प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल राठोड, तुकाराम पवार, गिरीश बिजलवाड, प्रवीण येवले, डी.एस. मुकाडे, लक्ष्मीकांत देशपांडे, राहुल गुंजेगावकर, दिलीप पुल्लेवाड, एच.एन. डोईफोडे, शिक्षण सभापतींचे स्वीय सहायक सुनील नवले, तुषार शेलार, सोनवणे, प्रोग्रामर सुरेंद्र रणदिवे, संगणक परिचालक अविनाश गजरे, मनोज लोखंडे आदींनी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी या पारदर्शक प्रक्रियेबद्दल यंत्रणेचे कौतुक केले.
अशी झाली पदस्थापना
उपस्थित ४३ शिक्षकांना रिक्त पदे दाखवून त्यांच्या स्वेच्छेप्रमाणे पदस्थापना देण्यात आल्या. प्रत्येक शिक्षकाला प्रोजेक्टर स्क्रीनवर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील रिक्त पदे दाखविण्यात आली. शासन निर्णयानुसार या पदस्थापना करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना पाहिजे असलेली जागा देण्यात आली. त्यामुळे सर्व पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
-----
मानवी दृष्टीने शिक्षकांची सहमती, शिक्षिकेला न्याय
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जि.प. माध्यमिक शाळेत अभय कुमार दिनकर पवार हे
कार्यरत होते. त्यांचे कोविड-१९ आजारामुळे दुर्दैवी निधन झाले. समुपदेशन प्रक्रिया आधी या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्व. पवार यांच्या पत्नी माधुरी गुलाब शिंदे यांना पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी आष्टी तालुक्यातील रिक्त असलेल्या जागेवर पदस्थापना द्यावी का, असे विचारले असता सर्व शिक्षकांनी मानवीय दृष्टीने उक्त ठिकाणी पदस्थापना देण्यासाठी होकार देत महिला शिक्षिकेला पदस्थापना देऊन न्याय देण्यात आला. अत्यंत पारदर्शक व शासन नियमाप्रमाणे पदस्थापना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
---------
पदस्थापना
पती-पत्नी एकत्रीकरण- १०
सर्वसाधारण - ३३
---------
===Photopath===
140621\14_2_bed_23_14062021_14.jpeg~140621\14_2_bed_22_14062021_14.jpeg
===Caption===
आंतरजिल्हा बदली~आंतरजिल्हा बदली