भाजी बाजारात ग्रामीण भागातून मुबलक आवक होत आहे. पालेभाज्यांचे दर अत्यंत कमी असल्याने ग्राहकी आहे. मेथीची आवक पुन्हा वाढल्याने दर नियंत्रणातच आहेत. लिंबू, कोथिंबिरीचे भाव तेजीत आहेत. वांगी, बटाटे, कांद्याची चंगली आवक असल्याने भाव कमी आहेत. टोमॅटो, पानकोबी व फुलकोबीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर कमालीचे घसरले असले तरी ग्राहकी नसल्याने शेतकरी, विक्रेते परेशान आहेत. दोडके, शेवग्याची आवक वाढली आहे.
फळ बाजारात तासगावच्या द्राक्षांची तसेच लालबाग, बदाम आंब्याची आवक सुरू झाली आहे. डाळिंबाला मागणी असूनही आवक कमी असल्याने दर तेजीत होते. मोसंबीला चांगला भाव होता.
-------
स्ट्रॉबेरी स्वस्त
द्राक्ष ६० ते ८० रुपये किलो होते. डाळिंबाचे भाव २०० रुपये किलो होते. स्ट्रॉबेरी बॉक्स ६० वरून ४० रुपये झाला. मोसंबी ५० ते ८० रुपये किलो होती. सफरचंदाचे भाव १२० ते १४० रुपये किलो होते. संत्री ४० तर कलिंगड ४ रुपये किलो होते.
-----
शेंगदाणे वाढले
शेंगदाणे ९५ चे १०० रुपये किलो झाले. सूर्यफूल तेल १४०, सोयाबीन १३०, पाम ११० रुपये लीटर होते. गत आठवड्याच्या तुलनेत १५ लीटरचा डबा ४५ रुपयांनी कमी होता. तूरडाळ ९५ ते १००, चणाडाळ ६०-६५, उडीदडाळ १०० ते ११०, तर मूगडाळ ९५ ते १०० रुपये किलो होती. गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल होते.
------------
३० रुपये विकल्या जाणाऱ्या बटाट्याचे भाव १५ ते २० रुपये किलो होते. कांद्यातही घसरण होऊन भाव ३० रुपये किलो होते. कोबी, टोमॅटो ५ रुपये, वांगी २० तर भेंडी ३० रुपये किलो हाेती. मेथी दहा रुपयांना ६ जुड्यांची विक्री झाली. मटार शेंग २५ तर गाजर १५ रुपये किलो होते.
------------
हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने भाव ६० रुपये किलो आहेत. स्थानिक आवक वाढल्याने टोमॅटो, बटाटे, कांद्याचे भाव उतरले आहेत. कोबी स्वस्त झाली असली तरी ग्राहकी नाही.
- कैलास काळे, भाजी विक्रेता
-------
बाजारात आंबे दाखल झाले आहेत. सफरचंद, डाळिंबाला मागणी आहे. पंजाब संत्रीचे भावही कमी झाले आहेत. फळे स्वस्त आहेत, परंतु ग्राहकी साधारण आहे.
- अयान बागवान, फळ विक्रेता
---------
मंडईत भाज्या, फळे स्वस्त आहेत. परंतु खाद्यतेल महागल्याने किराणाचे बजेट बिघडले आहे. डाळी स्वस्त असल्या तरी चहापत्ती महागली आहे. -