परळी : महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे. वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपाची वीज तोडणी थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनी एका बैठकीत दिला आहे.
मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक प्रा. टी. पी. मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झाली. यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प. सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते.
या बैठकीत प्रा. मुंडे यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते .तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते. आणि १०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही. शेतकऱ्यांवर जर अन्याय झाला तर तो आपण सहन करणार नाही असे प्रा. मुंडे यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात वीज तोडणी चालू आहे. त्यामुळे पिकांना जोपासायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी,दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात शेतकऱ्यांजवळ थकबाकी भरण्यास पैसे नाहीत दरम्यान वाण प्रकल्पात पाणीसाठा मुबलक असतानाच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली असतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे. यातून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रा. मुंडे यांनी दिला. या बैठकीला परिसरातील कृषिपंप धारक शेतकरी ,सरपंच, परिसरातील नेते ,सेवा सोसायटीचे चेअरमन आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
190321\sanjay khakare_img-20210319-wa0002_14.jpg
===Caption===
मांडखेल येथे वाण धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकीत प्रा. टी. पी. मुंडे यांनी समस्या एैकून वीज कंपनीने तोडगा काढावा नसता आंदोलनाचा इशारा दिला.