बीड : ओबीसी ( OBC Reservation ) व मराठात ( Maratha Reservation ) आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. पण ओबीसी मराठा एकच आहे. मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja munde ) यांनी आज सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात दिली. तसेच ओबीसींना न्याय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. मराठा आरक्षण भेटल्या शिवाय हार स्वीकारणार नाही अशी घोषणा ही यावेळी पंकजा यांनी केली.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, दसरा मेळाव्याची परंपरा आहे. हा मेळावा भक्ती आणि शक्तीचा परंपरेचा आहे. मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांना फुले वाहिली. आई जशी दृष्ट काढते तशी मी तुमची पदराने दृष्ट काढली. आज राज्यात काय परिस्थिती आहे. तुमच्या शिवाय माझ कोण आहे. तुमच्यावर मी जीव ओवाळून टाकते अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या. तसेच गोपीनाथ मुंडे यांची शक्ती जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही केले आहे. तुमच्या ताकदीमुळे मला कोणी रोखू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच सता नाही म्हणून मेळावा नको. मुंडे साहेबांनी मेळाव्याची परंपरा कधी मोडली नाही. मी का मोडू? असा सवाल करून त्यांनी विरोधकांना इशारा ही दिला. गावागावात प्रार्थनालाय, रुग्णालये, शाळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन करा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारचे पॅकेज तोकडे आहेउपाशी माणूस उपाशी आहे. ज्यांची पोट भरलेली आहे. त्यांचीच पोट आणखी मोठे होत आहेत. कोरोनात आम्हीही मदत केली..अतिवृष्टीत प्रीतम मुंडे आणि मी दौरे केले. सरकारने पॅकेज कमी दिले. ते तोकडे आहे. आणखी मोठे पॅकेज द्या. अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.