इंडियन टॅलेंट सर्च एक्झामिनेशन अर्थातच भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडीचा विद्यार्थी श्रीकांत सूर्यकांत तेलंग याने संपूर्ण राज्यामधून द्वितीय क्रमांक पटकावला असून याच शाळेचा विद्यार्थी मोरे प्रणव विनोद हा अंबाजोगाई तालुक्यातून सर्व द्वितीय आलेला आहे.
गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथे शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असणाऱ्या सर्व बौद्धिक आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले जाते. प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सोबतच दांड सुरज सतीश, शेळके आशिष बाळासाहेब, पावडे भागवत दिलीप, थोरात रिया राजकुमार, शेळके अनुरथ भरत, लाखे अनिकेत अशोक, लोखंडे समृद्धी नितीन, कांगटे विशाल विठ्ठल, शेवाळे प्राजक्ता सतीश, पवार योगेश ज्ञानोबा, धनवटे राम संजय या विद्यार्थ्यांनीही विशेष यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षिका कोंनाळे सोनाली, काळदाते शीतल, गोरे मनेष, शिंदे बाळासाहेब, चव्हाण पंडित या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका काकडे एस. एस. यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सहशिक्षक शेरे नामदेव, भिसे विजय, इंगळे दीपक, प्रकाश बोरगावकर, सरवदे शुभांगी, मोरे संगीता, जगताप मनिषा, शिक्षकेतर कर्मचारी नाईकवाडे प्रदीप, पवार सुग्रीव, चाटे नंदा यांची उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष भागवत गोरे, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव मनोहर काकडे, कोषाध्यक्ष शंकरराव कदम, सदस्य पांडुरंग जोगदंड, मुरलीधर थापडे, पांडुरंग गोरे, सूर्यकांत धायगुडे, अभयसिंह भोसले, प्रीतम काळदाते, हरिश्चंद्र हंडीबाग यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
===Photopath===
260221\26bed_5_26022021_14.jpg