शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:48 IST

जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : दोन महिन्यांपूर्वी राजकीय निवृत्ती जाहीर करून वारसदार म्हणून पुतण्याचे नाव पुढे केले. उमेदवारीसाठीही पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. इकडे पुतण्या जयसिंह साेळंके मात्र, मलाच उमेदवारी मिळेल, या आविर्भावात राहिले. ऐनवेळी अजित पवार गटाने विरोधी उमेदवार बदलल्याचे कारण देत पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी दिली. परंतु, हे पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळेच आजही त्यांच्यात धुसफूस सुरूच असून, उमेदवारी बदलण्याची मागणी करीत आहेत. प्रकाश सोळंके यांनी मात्र, पुतण्याला अंधारात ठेवून स्वत:साठीच प्रचार केला होता, अशी चर्चा मतदारसंघात आहे. आता पुतण्याचे कार्यकर्ते पुढील निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत सहानुभूती मिळवीत विजय मिळविला होता. मागील पाच वर्षांत मतदारांमध्ये असलेली नाराजी पाहता प्रकाश सोळंके यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांना वारस म्हणून पुढे करीत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जयसिंह सोळंके यांनी मतदारसंघातील गाव न गाव, वस्ती, वाड्या, तांडे, आदी ठिकाणी जाऊन एक प्रचार दौरा पूर्ण केला होता. एकीकडे पुतण्या फिरत असताना दुसरीकडे आ. प्रकाश सोळंके हे एक दिवसही घरी न बसता मतदारसंघातील कायम गावोगावी प्रचार दौरा करताना दिसत होते. मागील एक वर्षात त्यांचा मतदारसंघात दोन-तीन वेळा प्रचार दौरा केला होता. प्रकाश सोळंके हे मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरत होते त्यावरून राजकीय विश्लेषकांमध्ये वारंवार विषय चर्चिला जायचा तो म्हणजे प्रकाश सोळंके हे पुतण्याला पुढे करीत असून, ते पुतण्याला कधीही तिकीट मिळू देणार नाही. ते जे प्रचार करीत आहेत ते पुतण्यासाठी न करता स्वतःसाठीच करत असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांचे हे मत खरे ठरले, असेच म्हणावे लागेल.

पुतण्याच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या घरासमोर ठिय्याजयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता. परंतु, अजित पवार यांनी मी कोरा बी फॉर्म दिला असून, त्यांनी कोणाचे नाव लिहावे हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांना परत पाठविले होते. जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते खूपच नाराज असल्याचे दिसून येऊ लागले असून, ते वेगळा निर्णय घेण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.

तर काका-पुतण्यात लढत ?लोकसभा निवडणूक संपताच जयसिंह सोळंके हे दोन वेळा जयंत पाटील व शरद पवार यांची भेट घेऊन आल्याची माहिती प्रकाश सोळंके यांना मिळाली होती. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार हे पुतण्याला तिकीट देऊन माझ्या विरोधात लढवू शकत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जयसिंह सोळंके यांना वारस म्हणून जाहीर केले होते. परंतु पुतण्या प्रामाणिक राहिला. ऐनवळी त्यांनी माघार घेतली. जर जयसिंह यांना उमेदवारी मिळाली असती तर यावेळी काका-पुतण्यात लढत झाली असती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेस