शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गर्भवती महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:34 AM

गेवराई : अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात ...

गेवराई : अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात छळ केला. गर्भपात करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात आला. छळ असह्य झाल्याने, अखेर त्या विवाहितेने २५ जुलै रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गेवराई तालुक्यातील शेकटा येथील या घटनेत विवाहितेच्या पतीसह दीर, जाऊ आणि सासूवर गुन्हा नोंदविण्यात आला.

मोनिका भीमाशंकर भारती (वय २२, रा.शेकटा, ता.गेवराई) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिकाचे वडील दत्ता राजाराम गिरी यांच्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह आठ महिन्यांपूर्वी भीमाशंकर नारायण भारतीसोबत झाला होता. सुरुवातीचे चार-पाच महिने चांगले गेल्यानंतर, घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत पती भीमाशंकर, दीर राहुल, जाऊ मीनाक्षी आणि सासू संजीवनी या चौघांनी मोनिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत असे. या प्रकरणी दत्ता गिरी यांच्या फिर्यादीवरून मोनिकाचा पती, दीर, जाऊ आणि सासूवर गेवराई पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

----

मुलीच्या छळाबद्दल माहिती झाल्याने मोनिकाच्या वडिलांनी उसनवारी करून कसेबसे ७० हजार रुपये जमा केले आणि तिच्या सासरी दिले, तरीही अधिक रकमेसाठी तिचा छळ सुरू राहिला. दरम्यान, मोनिका गर्भवती राहिली असता तिच्या पतीने आत्ताच मूल नको, म्हणून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव टाकला. अखेर सततच्या छळास कंटाळलेल्या चार महिन्यांच्या गर्भवती मोनिकाने रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.