बीड : जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग आर. बी. करपे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बी. पी. चाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन आर. व्ही. सुरेवाड, अधीक्षक अभियंता महावितरण एस.पी.सरग, ए. आर. पाटील, जिल्हा आपत्ती प्राधिकरण अधिकारी शिरके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असून नांदूर मधमेश्वर, निळवंडे आणि मुळा या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही.कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये म्हणून जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणार असल्यामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी नोडल अधिकारी नेमून गेवराई तालुक्यातील ३२ गावे, माजलगाव तालुक्यातील २६ गावे व परळी तालुक्यातील ५ असे एकूण ६३ गोदाकाठच्या गावातील प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभाग, महावितरण, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यांना पूर्वतयारी करण्याच्याही सूचना यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना दिल्या.
धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:49 PM
जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.
ठळक मुद्देबीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा