...
कापसाच्या दोड्या फुटू लागल्या
शिरूर कासार : तालुक्यात जवळपास तीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापसाच्या दोड्यातून पांढ-या शुभ्र कापसाने बाहेर डोकावल्याचे चित्र दिसू लागले आहे. तरी मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी झोडपली होती. यावेळी पातेगळ झाली. त्याचा कपाशीला फटका बसला आहे. याबरोबरच सोमवारी पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या पावसाचा पिकांना फटका बसणार आहे.
...
गणपती बाप्पाचे शांततेत विसर्जन
शिरूर कासार : कोरोना निर्बंधांमुळे गणेश उत्सव शांततेत पार पडला. ना ढोल, ना ताशा, ना डीजे.. रविवारी विसर्जन मिरवणूकदेखील काढली नाही. नगरपंचायतीकडून दोन वाहनांची सजावट केली. त्यातच विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवून गणपतीचे सामूहिक विसर्जन सिंदफना नदीच्या डोहात करण्यात आले.
...
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शिरूर कासार : हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन, चार दिवसांत मोठा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी पावसाला सुरुवातदेखील झाली आहे. नदीपात्रात आता मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सिंदफना मध्यम प्रकल्प, बेलपारा प्रकल्प या आधीच ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सिंदफना नदीला येण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठी असलेल्या गावांनी सावध राहणे गरजेचे आहे. तूर्तास आपण शक्यतो सायंकाळी इतरत्र मुक्कामी थांबावे. आपले पशुधनदेखील नदीपात्रापासून दूर ठेवावे, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे व नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.
200921\img20210920115610.jpg
फोटो