....
मंदिर कधी उघडणार
शिरूर कासार : कोरोना महामारीने अनेक दिवसांपासून मंदिराचे दरवाजे बंद झाले आहेत, भाविक पायरी दर्शनावरच समाधान मानत आहेत, आता सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी मंदिराबाबत कुठेच बोलले जात नाही, पवित्र श्रावण महिन्यात देखील मंदिरे बंदच राहिले आहेत. आता कोरोना मंदावला असल्याने मंदिराचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी मालिकातून केली जात आहे.
....
तिंतरवणी मंडळात जोराचा पाऊस
शिरूर कासार : तालुक्यातील तिंतरवणी मंडळात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. ओढे, नाले प्रथमच वाहू लागल्याचे चित्र आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे, मात्र अद्यापही नद्या व जलाशये कोरडी असल्याचे चित्र कायम आहे.
...
उडीद पिकाला दुहेरी फटका
शिरूर कासार : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर उडीद पेरा झाला होता. सुरूवातीस हे पीक जोमात होते. मात्र मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच आता काढणीला आलेले उडीद पावसामुळे शेतातच भिजत असल्याने दुहेरी फटका बसला असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
....
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
शिरूर कासार : सध्या कोरोना मंदावला असला तरी तो संपला म्हणता येणार नाही, कोविडचे सौम्य लक्षणे दिसून आल्यास डाॅक्टरांनी दिलेली औषधी, पॅरासिटेमॉल गोळी घेणे,थंड पाणी पिऊ नये. भरपूर पाणी पिणे. तेही उकळलेले असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले आहे.