शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

ऐनवेळी नेते ठरविणार सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:54 PM

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींची ३० डिसेंबर रोजी निवड होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात सत्तांतरानंतर राजकीय समिकरणे बदलत आहेत.

ठळक मुद्देपंचायत समित्यांमध्ये आज बैठक : एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची दुसऱ्या गटाशी घरोबा करताना गोची

बीड : जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींची ३० डिसेंबर रोजी निवड होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात सत्तांतरानंतर राजकीय समिकरणे बदलत आहेत. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची दुसºया गटाशी घरोबा करताना मात्र तांत्रिक गोची झाली आहे. जिथे एकापेक्षा जास्त इच्छूक आहेत तिथे ऐनवेळी स्थानिक नेतेच सभापती ठरविणार आहेत.बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे पारडे जडबीड : येथील पंचायत समितीमध्ये सत्तांतराचे वारे वाहत असून, शिवसेना व शिवसंग्रामच्या सदस्यांनी राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ हे १० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पारडे जड असल्याने सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल असे चित्र आहे. सभापतीपदासाठी सारीका बळीराम गवते यांची वर्णी लागण्याची शक्यता असून, दहापेक्षा अधिक सदस्यांचे समर्थन असल्याचे बोलले जाते. दरम्यान शिवसंग्राम व शिवसेनेच्या वतीने त्यांच्या सदस्यांना व्हीप काढण्यात आला आहे.माजलगावात बिनविरोध निवडीची शक्यतामाजलगाव : येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व असून सभापती, उपसभापतींची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. येथील सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादीकडे एकमेव सदस्य सोनाली खुळे आहेत. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. पंचायत समितीत ८ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, तर ४ भाजपचे आहेत. सध्या भाजपचे दोन सदस्य राष्ट्रवादीसोबत असल्याने उपसभापती पदासाठी भाजप कसल्याही प्रकारची खेळी करु शकणार नाही हे स्पष्ट आहे. सभापतीपदासाठी डॉ. वसीम मनसबदार, चंद्रकांत वानखेडे, मिलिंद लगाडे, सुशील सोळंके, शिवाजी डाके यांची नावे चर्चेत आहेत. तर आ. प्रकाश सोळंके ठरवतील तोच या पदावर विराजमान होणार आहे.परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमतपरळी : येथील पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी पीठासन अधिकारी गणेश महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभा होत आहे. सभापती पदासाठी ऊर्मिला शशिकांत गीते व बालाजी मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीत राष्टÑवादी कॉँग्रेस व माकपचे ८ तर भाजपचे ४ सदस्य आहेत. राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत आहे. आ. धनंजय मुंडे सोमवारी सभापतीपदाचा उमेदवार निश्चित करतील, असे सूत्रांनी सांगितले.आमदार प्रकाश सोंळके ठरवतील तोच सभापतीवडवणी : पंचायत समितीमध्ये फक्त चार गण असून दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. पैकी तीन पं.स. सदस्य राष्ट्रवादीचे तर एक सदस्य भाजपचा आहे. या निवडीच्या संदर्भाने आ. प्रकाश सोंळके यांनी राष्ट्रवादीच्या पं. स. सदस्यांची बैठकदेखील घेतली. सभापती पद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. अंजना आजबे, श्रद्धा उजगरे यांची नावे चर्चेत आहेत. आ. सोंळके ठरवतील तोच सभापती होणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बजरंग साबळे म्हणाले.गेवराईत राष्ट्रवादी - शिवसेनेच्या युतीकडे लक्षगेवराई : येथील पंचायत समितीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने कोणाचा सभापती होईल अनिश्चित आहे. पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिल्याने शिवसेनेचा सभापती व उपसभापती झाला होता. येथे भाजपाचे ७ तर शिवसेनेचे ६ सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ सदस्य आहेत.पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीची युती झाल्यास बापुराव चव्हाण, भिष्माचार्य दाभाडे, सविता पानखडेजयसिंग काळे , परमेश्वर खरात यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मात्र अलिप्त राहिलेल्या आ.पवार गटाच्या हालचालींकडेही लक्ष लागले आहे.आष्टीत धस गटाचे वर्चस्व पण..येथील पंचायत समिती सभापतीपदी आ. धस गटाच्या टाकळसिंग गणातील सदस्या माधुरी जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तरराष्ट्रवादीकडून अर्चना अस्वर सभापती पदासाठी इच्छुक आहेत. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर आ.सुरेश धस यांच्या गटाचे सात सदस्य निवडून आले होते. सध्या आ. धस हे भाजपमध्ये आहेत. तर भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आ. भीमराव धोंडे गटाचे दोन, विजय गोल्हार गटाचे दोन, माजी आ.साहेबराव दरेकर गटाचे दोन सदस्य आहेत. तर आ.बाळासाहेब आजबे गटाचे राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत.भाजपचे धस, धोंडे,गोल्हार गट एकत्र होतील का हे पहावे लागणार आहे. उपसभापती पदासाठी भाजपकडून लक्ष्मी लोखंडे, अशोक मुळे, रमेश तांदळे, यशवंत खझगळे यांची नावे चर्चेत आहेत.पाटोद्यात सुवर्णा लांबरु ड यांची निवड निश्चितपाटोदा : येथील पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सुवर्णा काकासाहेब लांबरु ड तर उपसभापती पदी महेंद्र नागरगोजे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. सहा सदस्य असलेल्या या पंचायत समितीमधील चार सदस्य सहलीवर गेल्याचे समजले. सहा सदस्यांच्या या पंचायत समितीत माजी धोंडे गटाचे पाच तर धस गटाचे विद्याधर येवले हे एकमेव सदस्य आहेत. गत अडीच वर्षे पुष्पा मच्छिंद्र सोनवणे या सभापती होत्या. यावेळी धोंडे गटाच्या सुवर्णा लांबरु ड यांची सभापती, तर महेंद्र नागरगोजे यांची उपसभापती म्हणून निवडीची शक्यता आहे.राष्टÑवादी- भाजपचा लागणार कसधारूर : येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे समान बलाबल असल्याने सभापती व उपसभापती निवडीच्यावेळी भाग्यच महत्वाचे ठरणार आहे. तरीही दोन्ही पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवार निवडताना मात्र नेत्यांची कसोटी लागणार आहे. मागच्या वेळी समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निवड झाली होती. सभापती राकॉँचा झाला. उपसभापतीपदी भाजपला भाग्याने साथ दिली होती. या वेळी राकॉँचे विद्यमान सभापती आशालता सोंळके, चंद्रकला नाईकवाडे, बालासाहेब मोरे हे तर भाजपाकडून उपसभापती शिवाजी कांजगुंडे, माजी सभापती अर्जून तिडके, प्रकाश कोकाटे ईच्छूक आहेत. त्यामुळे येथील निवड चुरशीची ठरणार आहे.शिरुर कासारमध्ये उषा सरवदे एकमेवशिरुर कासार : येथील पंचायत समितीमध्ये भाजपचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य आहेत. यंदाचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी आहे. या प्रवर्गाच्या एकमेव महिला सदस्य असलेल्या उषा सरवदे सभापतीपदी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे, आ. सुरेश धस गटाचे वर्चस्व असलेल्या पंचायत समितीमध्ये जयदत्त क्षीरसागर समर्थक सरवदे यांना संधी चालून आली आहे.

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक