लोकमत न्यूज नेटवर्कबीड/माजलगाव : अंबाजोगाई येथे मंगळवारी लॉजवर छापा मारून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर बुधवारी माजलगाव शहरातील सन्मित्र कॉलनीतील एका कुंटणखान्यावर छापा मारण्यात आला. यामध्ये चार महिलांची सुटका करून आंटीसह नऊ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास केली. दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.
मागील आठवड्यात ‘अमावाक’च्या फौजदार दीपाली गित्ते यांना माजलगावमध्ये वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या चमुसह माजलगावात जाऊन खात्री केली. दोन दिवसांपूर्वी त्यांना याबाबत खात्री पटली. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी वेश्या व्यवसायासाठी महिला येणार असल्याची माहिती मिळताच गित्ते यांनी टिमसह माजलगावकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना माहिती दिली. त्याप्रमाणे एका डमी ग्राहकाकडे ३१० रूपये देऊन त्याला सदरील कुंटणखान्यावर पाठविण्यात आले. ग्राहकाकडून खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये परभणीची एक व माजलगावमधील तीन महिलांना ताब्यात घेतले. तसेच ९ ग्राहकांसह ललिता रावन अलझेंटे (४३) या महिलेला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भारत गाडे, पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, भारत माने, मीरा रेडेकर, निलावती खटाणे, शेख शमिम पाशा, रेखा गोरे, सतिष बहिरवाळ, गणपत पवार, विकास नेवडे यांनी केली.
पोलिसांचा मंदिरातून ‘वॉच’कारवाईच्या दोन तासांपूर्वीच पोलीस सन्मित्र कॉलनीतीलच कुंटणखान्यापासून २०० मिटर अंतरावर दबा धरून बसले होते. यासाठी त्यांनी वेगवेगळे गटही तयार केले होते. डमी ग्राहकाकडून ‘इशारा’ मिळताच मंदिरात बसलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी धाव घेत कारवाई केली.
सात ग्राहक वेटींगवरया कारवाईत ९ ग्राहक ताब्यात घेण्यात आले. यातील दोघे महिलांसोबत अश्लिल चाळे करीत असताना रंगेहाथ पकडले तर बाकी सात ग्राहक आंटीकडे पैसे देऊन ‘वेटींग’वर होते. या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले.
घरालाच बनविले कुंटणखानाललिता ही आपल्या राहत्या घरातच हा कुंटणखाना चालवत होती. यासाठी तिने दोन खोल्या राखीव ठेवल्या होत्या. रोज याठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला येत होत्या. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याबरोबरच ५० टक्के रक्कमही वसुल केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन महिन्यांमध्ये चार कारवायाअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन महिन्यात चार मोठ्या कारवाया केल्या आहेत. अंबाजोगाईत दोन, बीड व माजलगावमधील प्रत्येकी एका कारवाईचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यात वेश्या व्यवसाय चालविणारांचे मोठे जाळे असल्याचे दिसते. हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाया केल्या जात आहेत.