शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

कैदी बनले टाळकरी अन् माळकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:31 AM

विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांच्या पुढाकारातून व प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव, माणूसकी ग्रुपच्या सहकार्याने मागील आठ दिवसांपासून येथील जिल्हा कारागृहात श्रावण विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.कीर्तन, प्रवचन, भारूड, भजन, पोवाड्यांच्या माध्यमातून कैद्यांचे मनोरंजनाबरोबरच त्यांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी प्रा.नाना महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अधीक्षक एम.एस.पवार, ह.भ.प. हरिदास जोगदंड, प्रा.संभाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत काल्याची दहीहंडी फोडली. कार्यक्रमामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी ओंकार महाराज कागदे, विष्णूपंत महाराज लोंढे, नवनाथ महाराज नाईकवाडे, अतुल महाराज येवले, अंगद महाराज सातपुते, संदीप महाराज आमटे, गणेश महाराज बांडे, रेवण महाराज वायभट, गोरख महाराज वायभटसह कारागृह कर्मचारी, कैदी, बंदी आदी उपस्थित होते.

‘दो आंखे बारह हाथ’ची झाली आठवणमराठवाड्यात बीड जिल्हा कारागृहात सलग सात दिवस कीर्तन महोत्सव प्रथमच झाला. या महोत्सवात अध्यात्मातून प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला. कारागृहातील बंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून व्ही. शांताराम यांच्या ‘ दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण अनेकांना झाली. अशा उपक्रमांमुळे कैदी आणि बंद्यांच्या मनात नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कारागृह प्रशासनाकडून प्रमाणपत्रकीर्तन महोत्सवाचे आयोजन करून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल कारागृह प्रशासनाच्या वतीने प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव व प्रा.संभाजी जाधव यांना कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले. यामुळे प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया प्रा.कदम महाराज यांनी व्यक्त केली.

मी बदललो, तुम्ही बदला - थोरातसहा वर्षांपूर्वी मी पण याच कारागृहात एक रात्र राहिलो आहे. त्यावेळी त्रास काय असतो, हे समजले आणि बदलण्याचा निर्णय घेतला. ज्या कारागृहात आरोपी म्हणून आलो आज त्याच कारागृहाच्या पालन पोषण समितीचा अध्यक्ष आहे. आणि ज्या रूग्णालयात पाच दिवस आरोपी म्हणून कोठडीत उपचार घेतले त्याच रूग्णालयाचा आज मी बॉस आहे. त्यामुळे झालेल्या घटना विसरून नवे आयुष्य सुरू करावे. प्रत्येकाने बदलण्याची जिद्द ठेवावी. मी जसा बदललो, तसे तुम्ही पण बदलू शकता, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कैद्यांना दिला. यावेळी डॉ.थोरात भावनिक झाले होते.

कीर्तन महोत्सव नव्हे आनंदोत्सव - पवारसात दिवस चाललेला हा कीर्तन महोत्सव नसून आमच्या बंदी, कैद्यांसाठी आनंद देणारा उत्सव ठरला. त्यांच्यात या महोत्सवामुळे काही प्रमाणात का होईन बदल झाला आहे. हे पाहून आनंद होत आहे. यापुढेही कैद्यांच्या मन:परिवर्तनासाठी असे कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्व सहकार्य राहील. या आनंदोत्सवाची सांगता झाल्याचे दु:ख होत असल्याचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी सांगितले.

पोलीस-कैद्यांनी लुटला फुगडीचा आनंदकाल्याचे कीर्तन सुरू होण्यापूर्वी कारागृहात दिंडी काढण्यात आली. यावेळी कैद्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत मृदंगाच्या तालावर ठेका धरला. तर दिंडी दरम्यान, आपण कोण आहोत, हे विसरून पोलीस, बंदी तसेच कैद्यांनी फुगड्या खेळल्या. यावरून कारागृहातील कैदी आणि बंद्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. त्यांचे मन: परिवर्तन करण्यात यश आल्याचे दिसून येते.

टॅग्स :BeedबीडPrisonतुरुंगMarathwadaमराठवाडा