अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनंतराव जगतकर, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीपक लामतुरे, डॉ. अविनाश काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मुंबई येथील गायक दत्ता शिंदे, वैशाली शिंदे आणि त्यांच्या आठ जणांच्या संचाने साथसंगत करीत माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी प्रबोधनपर भीमगीते आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची महती विषद करणारी एकापेक्षा एक सुश्राव्य गीते यावेळी सादर केली. अध्यक्षीय समारोप करताना अॅड. अनंतराव जगतकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरिता माता रमाई यांचे योगदान हे मोलाचे आहे. माता रमाईंनी आपल्या संसारात केलेला त्याग आणि कष्ट हे आजच्या स्त्रियांनी विसरू नये, रमाई यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांना कधी स्वतःच्या घराचा, कुटुंबाचा विचार करू न देता कायम समाजाचे हित व समाजाचा विचार करण्यासाठी प्रेरित केले. माता रमाईंनी केलेल्या त्यागाचा आदर्श समोर ठेवून आंबेडकरी चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांनी भविष्यातील वाटचाल करावी, अशी अपेक्षा ॲड.जगतकर यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. दीपक लामतुरे व डॉ.अविनाश काशीद यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवानराव ढगे यांनी करून उपस्थितांचे आभार देवानंद जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भगवानराव ढगे, श्रीराम सोनवणे, अर्जुन वाघचौरे, भीमराव सरवदे, बुद्धकरण जोगदंड, देवानंद जोगदंड, सूचिता सोनवणे व महिला मंडळ बोधीघाट, माणिक लांडगे, युवराज वाघचौरे यांच्यासह बोधीघाट येथील सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला.