शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:19 AM

आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्रींची साक्ष दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्रींची साक्ष दिली.शिरूर नगर पंचायतमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी नगर पंचायतच्या पटांगणात संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यात शहराच्या विकासाबाबत शब्दांचा पाऊस पडला, त्याचबरोबर विरोधकावरही सडकून टीकेची गारपीटच झाली. सोहळ्यादरम्यान भारतभूषण क्षीरसागर यांनी संथ, पण दमदार भाषणातून नगर पंचायतला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.अध्यक्षस्थानी न. पं.च्या प्रथम महिला अध्यक्ष मीराताई गाडेकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. सुरेश धस, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, वडवणीचे राजाभाऊ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य शिवाजी पवार, माऊली जरांगे, प्रकाश कवठेकर, रामहरी महानोर, डॉ. मधुसूदन खेडकर, विलास विधाते, शेख सादीक, विनोद मुळूक, गणेश वाघमारे,आश्रूबा खरमाटे, निवृत्ती बेदरे, अ‍ॅड. प्रकाश बडे, अशोक सव्वासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रावसाहेब पाटील आदी होते.प्रास्ताविक भाषणात प्रकाश देसरडा यांनी भूमिका मांडली. त्यानंतर अश्विनी भांडेकर, वर्षा सानप, आशा शिंदे या महिला नगरसेविकांसह संदीप पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजाभाऊ मुंडे यांनी वडवणीच्या विकासाचे गमक सांगितले. क्षीरसागर यांनी शिरूर न.पं.ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगून बीडचा अनुभवी कर्मचारी वर्ग गरजेनुसार देण्यात येईल. विकास कामाची घाई करू नका, त्यात चुका होतात याचा अनुभव मला आल्याचे सांगितले. सर्वंकष आराखडा तयार करा व टप्प्याने काम करा, असे सांगून आदर्श नगर पंचायत होण्यासाठी सहकार्य करू. उद्यान, क्रीडांगण, व्यापारपेठेचे पुनरुज्जीवन आदींबाबत माहिती देत शिरूरला दोन आण्णा असल्याने काही उणीव भासणार नाही. आ. धस यांच्याबाबत ठेवलेली सद्भावना कारणी लागली असल्याचे सांगून वारसा आणि वसा सांभाळत सहकार्य करण्याची स्व. काकू व स्व. मुंडे यांची परंपरा आम्ही पक्षविरहित सांभाळत असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. धस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन फय्याज शेख यांनी केले, तर आभार दत्ता पाटील यांनी मानले. यावेळी शिरूरसह पंचक्रोशीतून लोकांनी गर्दी केली होती.राजकीय उलथापालथ : न.पं.मध्ये सत्तांतरसुरूवातीपासूनच शिरूर नगर पंचायत ही राष्ट्रवादीच्या म्हणजेच धस यांच्या ताब्यात होती. मात्र, त्यांच्या पक्षबदलीनंतर बऱ्याच उलथापालथी होऊन न्यायालयाच्या लढ्यात अखेर न.पं.मधे सत्तांतर घडून आले.धस यांचे समर्थक मीराताई गाडेकर (पाटील ) अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रकाश देसरडा यांची निवड करून रितसर बारा डिसेंबरला पदभार बहाल करण्यात आला.नवनिर्वाचित पदाधिका-यांनी आलेली मरगळ झटकून कामाला प्राधान्य दिले. काम सुरू केल्यानंतरच सत्काराला येईल, असा शब्द सुरेश धस यांनी दिला होता. त्याप्रमाणे रविवारी हा सोहळा आयोजित केला होता.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसBharat Bhushan Kshirsagarभारतभूषण क्षीरसागरPoliticsराजकारण