लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराच्या जवळील ईट येथील गजानन सहकारी सूतगिरणी अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक क्षमता वाढणार असून, यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अद्ययावत सूतगिरणीची पाहणी बुधवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली, या सूतगिरणीमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.ईट येथे ८९ कोटी रुपयांचा नविन अद्ययावत सुतगिरणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामध्ये रोज २० ते ३० लाख रुपयांचा धागा निर्माण करण्याची क्षमता असून, २५० ते ३०० जणांना हाताला काम मिळणार आहे.सुतगिरणीत काम करण्यासाठी कुशल कामगार असावेत या दृष्टीने २०० कामगारांना प्रशिक्षणासाठी सातार, सांगली जिल्ह्यातील सुतगिरणीमध्ये पाठवण्यात आले होते. या सुतगिरणीमधून धागा निर्मिती सुरु झाली आहे. या सुतगिरणीमुळे बीडमधील उद्योगाला चालना मिळणार आहे.या उद्योगावर पुरक उद्योग उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा केला जाईल, अशी माहिती यावेळी क्षीरसागर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.वर्षाला होणार शंभर कोटींची उलाढालसध्या धागा निर्मिती सुरु आहे. सर्व यंत्रणांची उभारणी झाल्यानंतर रोज २२ ते २५ लाख रुपयांच्या गाठी लागतील. सूत गिरणीसाठी लागणाºया अत्याधुनिक यंत्रणेची खरेदी पूर्ण झाली असून, नियमित उत्पादन सुरू झाल्यानंतर १०० कोटींच्या पुढे उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली.
बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:01 AM